श्रीधर सुरोशे - लेख सूची

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग ३

निरनिराळ्या वस्तूंत जी अमूर्त वास्तवता शिल्लक राहते तिचा मार्क्सच्या विवेचनास अनुसरून एक अर्थ विशद करता येईल. तो असा : वस्तूतील ही अमूर्त वास्तवता म्हणजे एकाच प्रकारच्या मानवी श्रमांचे, त्यांचा कोणत्या प्रकारे उपयोग केला जातो याचा विचार न करता जे शिल्लक राहते अशा निव्वळ श्रमांचे घन स्वरूप होय. या सर्व वस्तूंविषयी जे सामान्य तत्त्व मांडता येईल …

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २

निसर्ग ही भौतिक पदार्थांची एक व्यवस्था होय, असे निसर्गाविषयीचे मत मान्य केल्यास, निसर्गाकडे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा उत्पादनाचा स्त्रोत म्हणून पाहता येईल, अशी अनेक अर्थशास्त्रज्ञांची निसर्गाविषयीची भूमिका असते. मार्क्सही याला अपवाद नाही.  मानव निसर्गात, निसर्गाच्या साह्याने जगणारा प्राणी आहे म्हणजे तो निसर्गावर जगणारा प्राणी आहे, असे म्हणण्यात हे अभिप्रेत असते की ज्या भौतिक पदार्थांची एक व्यवस्था निसर्ग …

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग १

जगाच्या इतिहासात जी प्रतिभावंतांची मांदियाळी होऊन गेली, त्यांपैकी मूलगामी विचारवंत म्हणून संपूर्ण जगाला परिचित असलेल्या कार्ल मार्क्सच्या अर्थशास्त्राची अन्वेषणा करण्याचे येथे योजले आहे. ही अन्वेषणा मुख्यत: मार्क्सच्या अर्थशास्त्रीय दृष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. मार्क्सला स्वीकारण्या अथवा नाकारण्याऐवजी त्याला समजून घेण्यात ज्यांना रस आहे, केवळ अशा व्यक्तींच्या दृष्टीनेच ह्या लेखमालेस काही मूल्य असू शकेल. प्रस्तुत लेखनाचा …

बुद्धिप्रामाण्यवादाचे स्वरूप

प्रा. मे.पुं रेगे ह्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे विवेचन : आज एकविसाव्या शतकातही ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा’ उत्स्फूर्तपणे प्रचार करण्याची, त्याचे महत्त्व पटवून सांगण्याची आवश्यकता अनेकांना वाटते, त्यामागचे कारण काय? बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे आणि ते आपण केले तरच भारतीय समाजात काही ‘सुधारणा’ होऊ शकेल, अशी समजूत बहुधा त्यामागे असते. बुद्धिप्रामाण्यवाद ही केवळ एक विचारसरणी नसून, ती एक …

आपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान 

तत्त्वज्ञानाने आजतागायत जी कार्ये इतर काळांत पार पाडलेली आहेत, त्यांच्याशी तुलना केली असता आपल्या आजच्या काळाकरिता तत्त्वज्ञान काही तऱ्हेवाईक प्रकारचे कार्य करीत आहे अथवा करू शकेल, असे मी समजत नाही. तत्त्वज्ञानाचे एक निश्चित असे शाश्वत मूल्य असते आणि बहुधा ते अपरिवर्तनीय स्वरूपाचे असते. या गोष्टीला एखादा अपवाद असलाच, तर तो असा : सुज्ञतेच्या संदर्भात एक …

इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २

“The educator has to be educated,in modern jargon,the brain of the brain-washer has itself been washed.”  — Karl Marx इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान हे जेव्हा इतिहासाला स्व-रूपाची जाणीव झाली व ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली; तेव्हाच निर्माण होणे शक्य होते. अशी जाणीव पाश्चात्य परंपरेत आपल्याला अठराव्या शतकापासून निर्माण होत आलेली दिसून येते. ही इतिहासविषयक ‘जाणीवेची …

इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग १

“To the historian, the activities whose history he is studying are not spectacles to be watched, but experiences to be lived through in his own mind; they are objective, or known to him, only because they are also subjective, or activities of his own.” – R.G.Collingwood (The Idea of History) इतिहास हा शब्द आपण अनेक …

आजची युगनिष्ठा

‘ऐहिक निष्ठा ही आजची युगनिष्ठा आहे.’, असे आज ढोबळमानाने म्हणता येईल. ढोबळमानाने याकरिता कारण, मानवाच्या एकमूलकतेचे गृहितक हे आता मानवशास्त्राने टाकून दिले आहे. त्यामुळे, मानवी समाजाची आणि म्हणून सर्व व्यक्तींची (individuals) मूल्यनिष्ठा सर्वत्र एकसारखीच आहे, असे मानण्यातील तर्कदोष उघड आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ती तशी कधी होती का? असे विचारल्यास, त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. उलट, ती …

सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे: पूर्वार्ध (ग्रंथपरिचय)

श्री. बर्ट्रांड रसेल लिखित ‘The Principles Of Social Reconstruction’ ह्या अल्पाक्षररमणीय ग्रंथाचे प्रचलित अरिष्टामुळे मिळालेल्या फावल्या वेळात वाचन करण्याची संधी मिळाली. कोविड-१९ अरिष्टामुळे संपूर्ण जग अगदी ढवळून निघाले आहे…निघत आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा जागतिक समाजावर (Global society), राष्ट्रांवर, समाजव्यवस्थेवर तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर अल्पकालीन (Short-run) तसेच दीर्घकालीन (Long-run) होणाऱ्या प्रभावाचे स्वरूप कसे असेल आणि त्या प्रभावाची …

सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे : उत्तरार्ध (ग्रंथसमीक्षा)

प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात श्री.रसेल ह्यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ ह्या ग्रंथाच्या सारांशाविषयी जे विवेचन केले होते, ते मुख्यतः मांडणीप्रधान असून, ग्रंथाची स्थूलमानाने रूपरेषा देणे, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. परंतु मांडणी म्हणजे चिकित्सा नव्हे. त्यामुळे, आता आपण खंडणप्रधान विवेचनाकडे वळूया, ज्यायोगे श्री. रसेलांची नेमकी भूमिका वाचकांसमोर येईल, अशी आशा आहे. परंतु जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो, …

गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १

‘आपल्या नातवंडांसाठीच्या आर्थिक संभाव्यता’ (The economic possibilities for our grandchildren) ह्या १९३० साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात अर्थतज्ज्ञ श्री. जे. एम. केन्स ह्यांनी जे भाकीत वर्तविले होते, ते असे : “२०३० सालापर्यंत जगातील जवळजवळ सर्वच आर्थिक समस्या सुटलेल्या असतील. महामंदीसारख्याच समस्या नव्हे, तर ज्या ज्या म्हणून मूलभूत आर्थिक समस्या आहेत, त्या सर्वच समस्यांची सोडवणूक होऊन, जग हे संघर्षमय युगातून निघून अधिकाधिक …

गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग २

(ब)  एका वस्तूच्या मोबदल्यात दुसऱ्या वस्तूची देवाणघेवाण म्हणजेच वस्तूविनिमय होय. कालांतराने, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, मूल्यांच्या सामायिक मापदंडांचा अभाव, वस्तूचा साठा करण्याची अडचण, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण, विलंबित देणी देण्यातील अडचण यांसारख्या अनेक समस्यांमुळे वस्तुविनिमयव्यवस्था मागे पडली. तिची जागा मुद्राविनिमयाने घेतली. पशूमुद्रा, वस्तूमुद्रा, धातूमुद्रा, नाणी, कागदीमुद्रा यांपासून ते पतमुद्रा, प्लॅस्टिक मुद्रा, इलेक्ट्रॉनिक्स मुद्रेपर्यंत मुद्रेची उत्क्रांती आपल्या परिचयाची आहे. साहजिकच, आज आपल्यापैकी कुणीही मुद्राविनिमयापासून मुक्त नाही. व्यापार, विपणनव्यवस्था (market system) आणि उत्पादनप्रक्रियांचा पाया विनिमयप्रक्रिया …

गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग ३

(क) आता आपण विनिमयव्यस्थेच्या तात्तविक पायाची चिकित्सा करूया. यासंदर्भात तृष्णा, सुख आणि उपयोगिता या संज्ञाच्या अर्थाविषयी थोडा खुलासा करू. तृष्णा आणि सुख ह्या मानसशास्त्रातील संज्ञा आहेत; परंतु सुखवादी पंथाच्या (Hedonism school) लोकांनी त्यांचा नीतीशास्त्रात प्रयोग केला. मानवाला इच्छा-आकांक्षा, आशा, स्वप्ने असणे स्वाभाविक आहे आणि त्यांची पूर्तता झाली की मानव सुखी होतो, अशी आपली सुखाची संकल्पना असते. किंबहुना, परिपूर्तीची अवस्था गाठण्यासाठी मानवाने आधी सुखी असले पाहिजे, असेही …

कोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे

अरिष्टांच्या काळात माणसाला सुस्पष्ट आत्मविश्वासाची आणि डोळस आशावादाची गरज असते. कोविड-१९ अरिष्टाने आपल्या पूर्वश्रद्धा, विश्वास आणि समजुतींमध्ये आमूलाग्र बदल घडविला आहे. प्रत्येक अरिष्टाप्रमाणेच कोविड-१९ अरिष्ट हे सुद्धा ‘मानवी कृतीमागच्या प्रेरकशक्तीं’तून (Spring of human action) उद्भवले असून, मानवाने आपल्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोरावर भौतिक जगावर आणि निसर्गसृष्टीवर मिळविलेल्या आणि उत्तरोत्तर वाढतच जाणाऱ्या वर्चस्वाचे ते फलित आहे. या अरिष्टाच्या दीर्घकालीन व विशेषतः आर्थिक परिणामांविषयी तज्ज्ञांमध्ये विचारमंथन सुरू झाले असून, संभाव्य उपायांची मांडणी केली जात …